Tuch Tujhi Sobati lyrics- तूच तुझी सोबती- sonalee kulkarni

Tuch Tujhi Sobati lyrics

Tuch Tujhi Sobati lyrics in marathi sung by Sonalee Kulkarni. Tuch Tujhi Sobati song lyrics written by Gauri Sarnaik.

Tuch Tujhi Sobati lyrics marathi(तूच तुझी सोबती)

कुठल्याश्या वळणावरी असेल गाव ओळखीचे
नको घाबरु वळणांना आहे ते तुझ्या सोबतीचे..

उघडूनी डोळे बघ मिळतील साथीदार
दाखवतील ते वाट तू चाल बिनधास्त..

दूर दूर वाट जाते डोंगराच्या मिठीतूनी
पलीकडे उभा असेल तुझ्या यशाचा पक्षी..

कोरडा उभा हा उंच भेगा त्याच्या अंतरी
उमटती त्याच रेषा तुझ्या तळहातावरी..

खडकाची ही वाट लागेल तुला ठेच
चालावे लागेल तुला तुझे ध्येय हेच..

कधी मध्यानीचा सूर्य जीव होईल व्याकुळ
पाणी झिरपता गाली बघ येईल बहर..

डोकावतो संधिप्रकाश ह्या उंच पहाडातूनी
ह्या एकट्या प्रवासात तूच तुझी सोबती..

हो जराशी बेफिकीर घे थोडी मजा लुटून
थोडासा वेडा चाळा हीच जिंदगी ची धून..

चढायचे आहेच मोठे मोठे डोंगर
छोटे छोटे पाऊल टाक अगदी होऊन निडर..

दूर ठेव दृष्टी डोंगर रांगातून पार
चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार..

मनाच्या खोल डोहात जरी वादळे अनंत
तरी उभा हा निष्चल सर्व भार पेलवित…

मग हरायचे नाही बांध निष्चयाची गाठ
घे नकांशे हाती शोध तुझी तूच वाट..

जेव्हा दिसेल शिखर सुख होईल अनावर
घेता कवेत आकाश होईल जग जिंकल्याचा भास..

ह्या एकट्या प्रवासात, तूच तुझी सोबती
तूच तुझी सोबती..

Music Video

Leave a Reply