sangini lyrics – संगिनी – Aditya Mangate Asmita Bharti

sangini lyrics

sangini lyrics in Marathi sung by Anuradha Pendse. sangini song lyrics written by Vinayak Das.

sangini lyrics marathi (संगिनी)

तुझी होत जाते अशी मी
तुला समजून घेताना
हरवते क्षणात अशी मी
तुला जाणून घेताना

तुझा गंध हा मनी दाटला
नवा स्पंद हा उरी जागला

काही असे ऐकू येई अंतरी
होणार का मी तुझी संगिनी
काही असे ऐकू येई अंतरी
होणार का मी तुझी संगिनी

धुंद हि अशी तुझीच सारी
ओढते मला तुझ्याच दारी
भेटले तुझे स्वप्नात माझ्या
स्पर्श हा रेशमी देऊन जा रे

स्पंद हे काळजाचे उरी बोलते
नाते गत जन्मीचे कधी कधी सांगते

काही असे ऐकू येई अंतरी
होणार का मी तुझी संगिनी
काही असे ऐकू येई अंतरी
होणार का मी तुझी संगिनी

बेधुंद आज का वाहे अशी हवा
गंधाळल्या दाही दिशा
मन मोहरून आले हे असे कसे
जादू तुझी कि तुझा नशा

नभी सांडले जणू अंगणी
कि आले मी नभी तारांगणी

काही असे ऐकू येई अंतरी
होणार का मी तुझी संगिनी
काही असे ऐकू येई अंतरी
होणार का मी तुझी संगिनी

Music video

Leave a Reply