Skip to content

Paus Ha Tujha Ni Majha lyrics – पाऊस हा तुझा नि माझा – Sonalee Kulkarni

Paus Ha Tujha Ni Majha lyrics – पाऊस हा तुझा नि माझा – Sonalee Kulkarni

Paus Ha Tujha Ni Majha lyrics

Paus Ha Tujha Ni Majha lyrics marathi(पाऊस हा तुझा नि माझा)

वारा उनाड… खट्याळ पणे वाहत होता.
वेलींच्या त्या बटांना
हलकेच उडवून जात होता.
जाता जाता मग, तुला ही श्वासात भरत होता…
ढग हि मग गर्दी करू लागले
वाऱ्यावरती स्वार होऊन बरसण्यासाठी
त्या हिरव्यागार पानांमधून
जन्म घेत्या कळ्यांना पाहण्यासाठी…

पाऊस हा तुझा नि माझा
सोबती चा सुखावणारा
रिमझिम रिमझिम या बरसती धारा
हो….
पाऊस हा तुझा नि माझा
सोबती चा सुखावणारा
रिमझिम रिमझिम या बरसती धारा

निशब्द सारे जग होते
नीरव शांतता चहूकडे
पानांची ती एकसुरी सळसळ फक्त
गुणगुणत होती वाऱ्यासवे…
पाऊस ही मग त्याला साद घालण्या येता
तुझ्या माझ्या मनाच्या तारा
नकळत कुठेतरी जुळत होत्या…

आणि मग तुझा तो हळुवार स्पर्श
पाण्यामधून निसटत असताना
तुझ्या आठवणींचा गंध मात्र
ह्या पाना फुलांत बहरत होता…
क्षणातच सगळं ओलंचिंब करणारा
त्याच्या सोबत तुझ्या मनालाही
वहावत कुठेतरी घेऊन जाणारा…

हो पाऊस हा तुझा नि माझा
सोबती चा सुखावणारा
रिमझिम रिमझिम या बरसती धारा

ओल्या पायवाटांमधून
संथपणे वाहणारा
तुझ्या भावनांचे तरंग
शांतपणे स्वतःवर उमटवणारा..
कुणाचीही पर्वा न करता
एकटाच बरसणारा
ते ओले ठसे
मनात कायम जपून ठेवणारा.
अनाहूतपणे करून सगळं
मग एकटाच निघून जाणारा
पण…
मनाच्या आभाळातून मात्र
कायमचाच बरसत राहणारा…

पाऊस हा तुझा नि माझा
सोबती चा सुखावणारा
रिमझिम रिमझिम या बरसती धारा
हो….
पाऊस हा तुझा नि माझा
सोबती चा सुखावणारा
रिमझिम रिमझिम या बरसती धारा

Music Video

Leave a Reply

Your email address will not be published.