Marathi songs Lyrics in Hindi | best and selected hit songs

Marathi songs Lyrics in Hindi | best and selected hit songs

तुझ्या वरदाना जीव,Tujhya Vardana Jeev

तुझ्या वरदाना जीव भुकेला ।
योग जाहला तुजसह माझा ।
तेचि सुधेची धारा झाली ॥

जो नीवाला तुजविण फिरला ।
विसरुनि भाव जिवाला ।
तोंचि निराशा नाशा आली ॥

तुझ्या यशाचा हा पुनवचांद,Tujhya Yashacha Punav

तुझ्या यशाचा हा पुनवचांद
अमृत देई आर्त जिवाला ॥

प्रिय जनांच्या सुखि रे आता
उरला मला विसावा
करिति आसवे हीच सुखाची
शीतल जीवन-ज्वाला ॥

तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा,Tujhya Muralit Majhi Pratima

तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे
माझ्या डोळ्यांत मूर्ति तुझी विलसे

पदकमळे जी हरिची नाजुक
पैंजणेच मी त्यातिल मोहक
प्रभुची प्रीती मनि या आणिक
प्रेमळ भाव वसे

कृष्णमोहना मी तव माया
कमळमुखातिल वाणी मी राया
तुझीच सेवा सुखवी हृदया
अंतरि श्याम हसे

तुझं नि माझं जमेना,Tujha Ni Majha Jamena

तुझं नि माझं जमेना
परि माझ्यावाचुन करमेना

आवड तुजला भांडायाची
तूहि शोधिसी संधी त्याची

कैसे होइल जीवन सुखकर, जोवर तव ही रीती
हेच सुखाचे साधन सखये, तरुणांच्या संसारी
मानशील का तू मज राणी ?
होईन राजा मीहि त्याक्षणी
तू राजा, मी राणी जोवरी, कोण कुणाचा धनी ?
केव्हा मी तव स्वामी, केव्हा तू माझी स्वामिनी

तुझिया गे चरणीचा झालो,Tujhiya Ge Charanicha Jhalo

तुझिया गे चरणीचा झालो मृगनयनी दास

जन्मजन्मीचे नाते अपुले
कामिनी, मम हृदयी विरह दु:ख सले

तुजसाठी शंकरा भिल्लीण,Tujsathi Shankara Bhillin

तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले
धुंडित तूज आले

अंजन चर्चून चंद्रमुखाला, शामल सुंदर बनले
मृगाजिनाची कंचुकी घालून प्रतिबिंबाला हसले

नयनामधल्या जलगंगेला दुःख प्रीतिचे कथिले
म्हणते गंगा, ब्रम्ह कधी का मायेवरती रुसले

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,Tirtha Vitthal Kshetra Vitthal

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

तिमिरातुनी तेजाकडे,Timiratuni Tejakade

तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ।

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥

तारिल तुज अंबिका,Taril Tuj Ambika

तारिल तुज अंबिका, कशाला धरिसी मनि शंका !
शंकर-मन रंजिका, हरितसे भव-पातक पंका !

दयावती जी सहज उद्धरी हीन-दीन-रंका
कळिकाळावर जिचा धडधडा झडे विजय-डंका !

तारिणी नववसनधारिणी,Tarini Nav Vasan Dharini

तारिणी नववसनधारिणी ।
वात्सल्य हृदयी धरुनी ।
करिसी दया स्वजनी ॥

तळमळे अवघी प्रजा ।

उत्सवी मग्न राजा ।
साधितो शकुनी काजा ।
वैरी घर भरिती, स्वैरगती रमती ।
प्रजा जन फिरती रानी

तारिल हा तुज गिरिजाशंकर,Taril Ha Tuj Girija Shankar

तारिल हा तुज गिरिजाशंकर
भव चिंताहर मदन-गर्वहर

चंद्र कलाधर नट-राजेश्वर
करील विजयी तुला महेश्वर

तात करी दुहिता विनाशा,Taat Kari Duhita Vinasha

तात करी दुहिता विनाशा । बल द्याया वेगे । माते धाव गे ॥

अर्पुनि म्लान मुखी । चुंबनधारा ।
घे हृदयी फुलवी जिवाला ।
तव माया वेगे । माते धाव गे ॥

तस्कराहातीं द्विजगोधन,Taskarahati Dwijagodhan

तस्कराहातीं । द्विजगोधन हरिलें ।
तयां पार्थासि शरण आणिलें ।
आयुधागारीं धर्मा निजवीलें ।
द्रौपदीसह त्या दावियलें ।
मुनीच्या दंडा । पात्र त्यास केलें ।
तीर्थ यात्रेसी पाठविलें । नारदातें मीं ।

त्यासि भेटवीलें । इकडचें वृत्त जाणवीलें ।

तव भास अंतरा झाला,Tav Bhas Antara Jhala

तव भास अंतरा झाला मन रमता मोहना

हासती फुले भवताली
मधुर ये फळावर लाली
स्मितसाम्य तुझ्या अधरीचे मम खिळवी लोचना

वाहत ये झुळझुळ वारा
दरवळला परिमळ सारा
तव हृदयपुष्पगंधाची अनुभविते कल्पना

तरुण कुलिन गोरा,Tarun Kulin Gora

तरुण कुलिन गोरा, हंसतमुख, तरुण कुलिन गोरा ।
पाहिजे मुलीला चतुर सद्गुणी सुंदरसा नवरा ॥

(चाल) पुरवील तिची जो हौस सदा बहुपरी ।
घालील शाल जो मायेची तिजवरी ।
तिळमात्र तिला जो दु:ख न देइल घरीं ।
विद्वानांत हिरा, चकाकत, विद्वानांत हिरा ॥

तम निशेचा सरला,Tam Nishecha Sarala

तम निशेचा सरला ॥

अरुण कमल प्राचीवर फुलले
परिमल या गगनी भरला ॥

पावन शिवजग अवघे झाले
तव दयेचा दीप रे
अरुण कमल प्राचीवर फुलले
परिमल या गगनी भरला ॥

तनुविक्रय पाप महा,Tanu Vikray Paap Maha

तनुविक्रय पाप महा । पापांच्या वसलें कळसीं ।
स्त्रियांस भूषण लाज विनय हे कोमल भाव मनींचे ।
ते जाळाया धनार्थ नच तो देव घालि जन्मासी ॥

आलो कुठून कोठे,Aalo Kothun Kothe

आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट

काटे सरून गेले उरली फुले मनात

प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे

साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत

आवडती वस्तू लोभानें,Aavadati Vastu Lobhane

आवडती वस्तू लोभानें ।
पसरिला घ्यावयालागि हात किं यानें ॥

सकल करांगुलिंवर रेखा या दिसति ।

किं सविमल जालमिषानें ॥

कमल सकाळीं किंचित फुलतां
अविरलनवदलपरि मी मानें ॥

आल्या नाचत नाचत,Aalya Nachat Nachat

आल्या नाचत नाचत मेनका रंभा
आज अवतरली जशी इंद्रसभा

कानात पाचुची कर्णफुले
कंठात हि-यांची माळ रूळे
नवरत्न कटी वर चमचमले
जशी रवि-चंद्राची तेज:प्रभा

स्वर किन्नर गाती सप्त सूरा
दशदिशा उजळती रंग जरा
देहभान हरपले चराचरा
रसपान करीत नटराज उभा

कमला जनांचे घेई,Kamala Janache Ghei

कमला जनांचे घेई बलिदान ।
विभवानुभूता जगि जरि दिसे मान ॥

मांगल्य आहे नरकी धनाचें ।

गति खोल चांचल्य योगे मिळे जाण ॥

कन्या सासुऱ्याशीं जाये,Kanyaa Sasuryashi Jaye

कन्या सासुऱ्यासीं जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥

तैसें जालें माझ्या जिवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥

चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥

जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी ॥४॥

कधी सांजवेळी मला,Kadhi Sanjaveli Mala

कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी, पाहशील का ?

तुझा दूर येथे उठू दे शहारा

शरीरावरुनी जसा गार वारा, वाहशील का ?

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी राहशील का?

तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही साहशील का?

कधी भेटेन वनवासी,Kadhi Bheten Vanvasi

कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्रला
मला ते पाय अंतरले, कुळाला काळिमा आला

कशी राहिल कांतारी विरागी जानकी राणी
तिच्या वाटेवरी आता फुलांनो पाकळ्या घाला

तुझे सौभाग्य सौमित्रा, वनी तू राघवासंगे

अभागी मीच हा ऐसा जावुनी सांग रामाला

कधी अचानक सांग सखे,Kadhi Achanak Sang

कधी अचानक सांग सखे तू स्वप्नी माझ्या येशील का ?
इंद्रधनूचे सार रंगही नभात उधळून देशील का ?

श्रावणमासी सरसर धारा, टपटप गारा होशील का ?
उधाण वारा, मोरपिसारा, फुलवून कळी तू येशील का ?

कधी किनारी रूपकेशरी लाजलाजरी होशील का ?
अवतीभवती मिटले डोळे सांग बावरी होशील का ?

कधी न पाहिली तुला परंतु भास तुझे होती मज का ?
सतत तुझी ही चाहूल मजला येत राहते पुन्हा पुन्हा का ?

कधिं करिती लग्न माझें,Kadhi Kariti Lagna Majhe

कधिं करिती लग्न माझें तुज ठावें ईश्वरा ॥

वाढली उंच ही किती । हंसुनि बोलती ।
नाक मुरडिती । स्त्रिया परभारां ॥

मैत्रिणी वदति टोंचुनी । शब्द ते मनीं ।
जाति भेदुनी । सुरीच्या धारा ॥

जनक तो नांव काढिना । माय सुचविना ।
हौस मग कुणा । कोण झटणारा ॥

ज्यावरिं मीं विश्वास ठेविला,Jyavari Mi Vishvas Thevila

ज्यावरिं मीं विश्वास ठेविला ।
समजे प्राणप्रिय जो मजला ।
भजलों देवापरि मी ज्याला ।
तो ऐसा फिरला ॥

योग्य मी नव्हतों तद्भगिनीला ।
द्यावी होती अन्य नृपाला ।
कैसा मम वैरी सन्मानीला ।
हें दु:खद मजला ॥

ज्या हरीवर मी प्रिती केली,Jya Harivar Mi Preeti Keli

ज्या हरीवर मी प्रिती केली, जडले जयाचे पिसे
तयाला काळिज नाही कसे ?

रूप सुराला भुलुनी गेले
त्याच क्षणी मी त्याची झाली
सर्वस्वा मी वाहून बसले, करून घेतले हसे;
तयाला काळिज नाही कसे ?

एकांगी का प्रीत म्हणावी
फसगत माझी का समजावी
मीलन स्वप्ने किती बघावी, कुठवर सोडू उसासे;
तयाला काळिज नाही कसे ?

जांभुळपिकल्या झाडाखाली,Jambhul Pikalya Jhadakhali

जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी

समिन्द्राचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिस्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी

मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दानं उष्टं झालं जी

जांभुळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी

जांभळीचं बन थोडं, पिकून पिवळं झालं जी

जोहार मायबाप जोहार,Johar Maybap Johar

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालो ।
तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

बहु केली आस ।
तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥

जो लोककल्याण साधावया,Jo Lok-Kalyan Sadhavaya

जो लोककल्याण । साधावया जाण ।
घेई करी प्राण । त्या सौख्य कैचे ॥

बहु कष्ट जीवास । दुष्टान्न उपहास कारागृही वास ।
हे भोग त्याचे । निंदा जनीं त्रास ।
अपमान उपवास । अर्थी विपर्यास । हे व्हावयाचे ॥

जो आवडतो सर्वांला,Jo Aavadato Sarvala

जो आवडतो सर्वांला तोचि आवडे देवाला

दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी, फोडि पाझर पाषाणाला

घेउनि पंगु अपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी, देव अंथरी निज हृदयाला

जनसेवेचे बांधुन कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृदसिंहासन, नित भजतो मानवतेला

जेव्हां जेव्हां वाढायातें,Jevha Jevha Vadhayate

जेव्हां जेव्हां वाढायातें येइ सुभद्रा ती त्या यतितें ।
भुलुनि पाहुनि तद्‌रूपातें तैसे नाना ढंग करी ॥

पंक्तीमध्यें नसतों जरि मी भोळे तुम्हां पाहुनि नामी ।
भलतें भलतें करितीं स्वामी निश्चयपूर्वक मज वाटे ॥

जेथोनि उद्गार प्रसवे,Jethoni Udgar Prasave

जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार ।
तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥

जनक हा जगाचा जीवलग साचा ।

तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥

नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥

निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण ।
विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥

जेथ मित्रा तत्वार्थ,Jeth Mitra Tatvarth

जेथ मित्रा तत्वार्थ पहायाला ।
शक्ति नसते भुपाललोचनांला ।
तिथें वक्त्याला दैन्य रोंकडें तें ।
समज अथवा बहु निंद्य मरण येतें ॥

जे तुझ्याचसाठी होते,Je Tujhyach Sathi Hote

जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले

रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दूर एकटी, माझे डोळे ओले

त्या फुलासारखी अबोल माझी प्रीत
ती अबोल पूजा या माझ्या हृदयात
नच ओठांवरती नाव तुझे कधि आले

तुज कसे कळावे देवा ? नाही कळले :

मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फुलांत माझे हृदय ठेवुनी गेले

जुळल्या सुरेल तारा,Julalya Surel Tara

जुळल्या सुरेल तारा स्मरते अजुन नाते

डोळ्यांत भाव माझे गाती तुझीच गीते

स्वप्नापरी अजून ते दिवस भासतात
छळती उनाड रात्री हळुवार गीत गात
तो काळ आठविता नयनांत नीर दाटे

फिरलो मिळून दोघे गुंफुन हात हाती
फुलले गुलाब गाली स्पर्शात धुंद प्रिती
त्या कोवळ्या वयाला वरदान दिव्य होते

शब्दात रंगविले मी भाव स्वप्न भोळे
उरली न प्रीत अपुली हो बागही निराळे
त्या भाबड्या कळीला गीतात अर्ध्य देते

जीवित माझे हवे तुला,Jeevit Majhe Have Tula

जीवित माझे हवे तुला तर घेऊन जा तू आता
सुवासिनीचे कुंकू हिरावुन नकोस नेऊ नाथा

संसाराची पूजा जाशी उधळून अर्ध्यावरती
मंगल मी रे, रचिले देऊळ तुझ्याच मूर्तिभवती
अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीति

ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता

तुझ्यासवे तो हर्षही गेला, खेदही उरला नाही
पतिव्रतेला दर्शनाची खंतही आता नाही
कुंकुमतिलक भूषण भाळी इतुकेच नाथा देई
मिळेल मजला भाग्य सतीचे तूही जवळी नसता

जीवनाची वाट वेडी,Jeevanachi Vaat Vedi

जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते !
थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते ?

आसवांसाठीच डोळे- पापण्यांचे रांजण
हुंदक्यांचा हक्क येथे, हासण्यावरी बंधन
एकटे, बिन-चेहऱ्याचे, दैव केवळ हासते

भोवताली दिसती जे जे, ते सुखाचे सोबती
जीवनी कोणी न साथी, कोण धावे संकटी
मरण घेऊन रूप गोंडस जगून पुन्हा पाहते

देश हा देव असे माझा,Desh Ha Dev Ase Majha

देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्याहातुन तेजोमय पूजा

चंदन व्हावा देहच केवळ
भाव फुलांची भरुनी ओंजळ
प्राणज्योतिने ओवाळिन मी देवांचा राजा

धन्य अशा या समर्पणाने
या जन्माचे होइल सोने
मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा

देश हीच माता,Desh Heech Mata

देश हीच माता, देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता

धर्म पंथ नाही आम्हा जात गोत नाही

मुले माणसाची आम्ही, वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता

खुली ज्ञानविज्ञानाची, कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा

विस्मरू न आम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हा यशोदाता

देवाघरच्या फुला,Devagharachya Phula

देवाघरच्या फुला सोनुल्या, देवाघरच्या फुला !

अपुले मंगल सांगत नाते बाळ घरी हे रांगत येते
आनंदाने हसत खेळतो, झुलवित वारा झुला !

दुडुदुडु धावत हसे चिमुकला, असा जिवाचा माझा छकुला
अवतीभवती सुगंध सुंदर हाक घालितो तुला !

मायपित्याने तुला सोडिले, हृदयाने मम जवळ घेतले
भाग्यवान मी अमोल ठेवा असा लाभला मला !

देवाघरचे ज्ञात कुणाला,Devagharache Dnyat Kunala

देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम ?
कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम

मी निष्कांचन, निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम?

देवाचिये द्वारीं उभा,Devachiye Dwari Ubha

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।

पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥४॥

देवा धरिले चरण,Deva Dharile Charan

देवा धरिले चरण ।
भक्ति सुगति जगि मजला ।
भाव बोल सुचवि कोण ?
सकल तुज विभो मान ॥

सान थोर जीवांसि ।
रक्षितोसि हृषिकेशी ।
अचल तुझ्या पदी दीन ।
भय नुरवी होत लीन ॥

देवा तुझी आठवण होते,Deva Tujhi Aathavan Hote

देवा तुझी आठवण होते
सुख मावळते आणि शिरावर संकट कोसळते

सुंदर सुमने मुकती प्राणा उरात घुसती काटे
आग धगधगे वरती-खाली वाळवंट रखरखते

दुबळ्या जीवा कळे न जेंव्हा काय खरे अन्‌ खोटे
पिचते अंतर अन्‌ रक्ताचे पाणी-पाणी होते
केवळ ढळढळ अश्रू ढाळणे हेच नशिबी येते

देवरूप होऊ सगळे,Devroop Hou Sagale

देवरूप होऊ सगळे आम्ही एकियाच्या बळे

सप्तसागराला शक्ती, बिंदु बिंदु मिळता पाणी
एकजीवी अणुरेणूची, युगे युगे फिरते धरणी
प्रेमभाव स्वप्नी वचनी पाचामुखी ईश्वर बोले

भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकुन जाळे
पंख गुंतवून पंखी, एकरूप पक्षी झाले
गळ्यामधे घालुनी गळे, मृत्युलाच मारून गेले

वाढवीत भेदभावा, दुष्टतेचा फिरतो कावा
गाठुनिया भोळ्या जिवा, अंधारात घालित घावा
चित्त नित्य सावध ठेवा, एकलक्षी लावुनी डोळे

Leave a Reply