Best marathi songs lyrics in hindi
माझी मातुलकन्यका,Majhi Matul Kanyaka
माझी मातुलकन्यका रूपशीला ।
तिचा माझा बहु लोभ जुळुनि गेला ।
मान्य पूर्वी तद्बंधु असुनि त्याला ।
पुढें नीचांनीं वचनभंग केला ॥
माझी माय,Majhi Maay
चमचमत्या चांदण्यांचा कैफ आज अंबरात
हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या उरात
जाईन जरी कुठवरही ….. वंदनीय तीचे पाय
माझी माय !
सत्व एकच, दैव एकच, मंत्र एकच
माझी माय !
माझे माहेर पंढरी,Majhe Maher Pandhari
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी ॥१॥
बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा, करितसे पाप भंगा ॥४॥
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ॥५॥
माझ्या मना लागो छंद,Majhya Mana Lago Chhand
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥