aai mazi kalubai lyrics in marathi sung by adarsh shinde. aai mazi kalubai song lyrics starting on sony marathi, featuring alka kubal.
aai mazi kalubai lyrics marathi(आई माझी काळूबाई )
काळूबाईच्या नावान चांग भल
दुमदुमल नाव तुझ मंतरल ग
रूप तुझ पार्वतीच अवतरल ग
हुरहुरल भेटीला आतुरल ग
देवी तुझ्या दर्शनान दुख सरल ग
काळूदेवी आई चा गजर ग
तिचा सोनेरी मायेचा पदर ग
आदिशक्ती अंबा तू सत्वाची
तिला साऱ्यांचीच आहे खबर ग
आई माझी काळूबाई सावलीचा
आधार हा वाट चुकल्या लेकरांचा करते आई सांभाळ हा
हाक तुझी येत अंग थरथरल ग
आई माझी काळूबाई मन भरल ग
हुरहुरल भेटीला आतुरल ग
देवी तुझ्या दर्शनान दुख सरल ग
आई माझी काळूबाई