हवे तुझे दर्शन मजला,Have Tujhe Darshan Majala

हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी
प्रभू तुझ्या दारी आलो, हो‌उनी भिकारी

नको देउ पैका अडका, सोनियाचि खाण
माझ्या मुखी तव नामाची, पडू नये वाण
घडो तुझी सेवा म्हणुनी, आज रामपारी

एकनाथ, तुकया, गोरा, कबीर, सुदाम
जनाबाई, सखु, मीरेच्या मुखी तुझे नाम
तयापरी झालो वेडा, धाव रे मुरारी

प्रेमगाठ बांधुनि केली, अंतराचि झोळी
दोन करांची मी धरिली, तुझ्यापुढे थाळी
कृपाप्रसादाची तुझिया, घ्यावया शिदोरी

Leave a Reply