विठ्ठला समचरण तुझे,Vitthala Samacharan Tujhe

विठ्ठला, समचरण तुझे धरिते
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते

नेत्रकमल तव नित फुललेले
प्रेममरंदे किती भरलेले
तव गुण-गुंजी घालीत रुंजी
मानस-भ्रमरी फिरते

अरुण चंद्र हे जिथे उगवती
प्रसन्न तव त्या अधरावरती
होऊन राधा माझी प्रीति
अमृतमंथन करिते

जनी लाडकी नामयाची
गुंफुन माला प्राणफुलांची
अर्पून कंठी मुक्तीसाठी
अविरत दासी झुरते

Leave a Reply