वाऱ्यावरती घेत लकेरी, गात चालल्या जल-लहरी !
चहू दिशांना प्रेमरसांकित
लकेर घुमवि सुरेल संगित
अन् संध्येच्या गाली नकळत स्वप्न रंगवी निलांबरी !
ताल धरोनी हरित तृणाचे
मोहक पाते मुरडत नाचे
फूल होउनी कुंदकळीचे, गंध उधळिते मोदभरी
भेदभाव हे विसरुन सगळे
आनंदाने गायिलले
सप्त स्वरांचे गीत रंगले सात वेगळ्या सरोवरी