वाट पाहुनी जीव शिणला
दिसा मागुनी दिसं टळला
सुर्व्या आला, तळपून गेला
मावळतीच्या खळी गालाला
गडणी, सखे गडणी
कुटं गुंतला, सब्द इसरला
देऊन अपुल्या सजणीला
डोंगर वलंडून चांद चालला
चांदणं चारून धरतीला
मासं जोडी जोडीनं पव्हती
पाखरं संगती-संगतीनं फिरती
एक डहाळीवर बिलगून फुलती
फुल-कळ्या त्या येलाला