लपविलास तू हिरवा चाफा, Lapavilas Tu Hirava Chafa

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे
नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे
रंग गालिचा छपेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे
उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभिर होणे
चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छपेल का ?

Leave a Reply