Skip to content

रातराणी गीत म्हणे ग,Ratarani Geet Mhane Ga

fb-site

रातराणी गीत म्हणे ग
आज मनी प्रीत फुले ग
मीलन राती मी फुलले ग
रातराणी !

अंग अंग डोले झुल्यापरी
मन्मथ येईल मंदिरी
प्रिय सजणाची मी फुलराणी
जीवनगीत जुळे ग
रातराणी !

चांदरात येते फुलापरी
उमलून आली धरेवरी
आज सुखाची हसली प्राची
नभ धरणीस भिडे ग
रातराणी !

Leave a Reply

Your email address will not be published.