रघुवीर आज घरी,Raghuveer Aaj Ghari

रघुवीर आज घरी येणार
कमलफुलांच्या पायघड्यांवर कमलपदे पडणार

कमलांकित या शय्येवरती कमलनयन मिटणार

कमलेपरी मी बसून पदाशी कमलचरण चुरणार

कमलकळ्यांचे अधर प्रभूचे अधरांनी टिपणार

Leave a Reply