या रे या सुजन, आपण सारेजण
करू या भजन,
भजन, भजन, भजन
दुरित हरण हरिचे चरण
करू या स्मरण,
स्मरण, स्मरण, स्मरण
धृव चिलया प्रल्हादाने
गाईले भक्तीचे गाणे
प्रभू केला वश भजनाने
काया-वाचा-मन,
जाऊ सारेजण
प्रभूला शरण,
शरण, शरण, शरण
वाजवू भक्तीचा डंका
प्रभूसी मारू हाका
मग नाही आम्हाला धोका
होवू या पावन,
आपण सारेजण
करुनी भजन
भजन, भजन, भजन