Skip to content

माझी उदास गीते तू,Majhi Udas Geete Tu

fb-site

माझी उदास गीते तू ऐकतोस का रे ?
अन्‌ आसवांत माझ्या तू नाहतोस का रे ?

येताच तू समोरी मी दर्वळून जाते
माझ्यासमान तूही गंधाळतोस का रे ?

माझ्या मुक्या मनाच्या का छेडतोस तारा ?
माझ्यासवेच तूही झंकारतोस का रे ?

एकांत जीवनाचा अंधारला असू दे !
तू अंतरात माझ्या तेजाळतोस का रे ?

Leave a Reply

Your email address will not be published.