मधुवंतीच्या सुरासुरांतुन,Madhuvantichya Surasuratun

मधुवंतीच्या सुरासुरांतुन आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम !

नयनी माझ्या गोकुळ वसले
यमुनेचे जळ गाली झरले
राधेपरि मी सर्व वाहिले सुखशांतीचे धाम !

वसंतातले सरले कूजन
तुझ्याविना हे उदास जीवन
शोधित तुजला फिरते वणवण, नाहि जिवा विश्राम

दासी मीरा ये दाराशी
घे गिरिधारी, तव हृदयाशी
या पायाशी मथुरा काशी, तीर्थापरि हे नाम !

Leave a Reply