रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्नान
भुकेला भक्तीला भगवान
सेवून कण्या तो विदुराचा सौंगडी
त्या सुदाम्याचिया पोह्यांची आवडी
भाव-भक्तिचे तया आवडे एकच तुळशी-पान
जो जेवू घालतो नामदेव विठ्ठला
दामाजीसाठी धेड हरी जाहला
जनी संगती दळितो, त्याला भक्तांचा अभिमान
एकनाथा सदनी विठ्ठल भरितो घडे
तुकयाची भोळी भक्ती त्या आवडे
वारकऱ्यांसह नाचू लागे भजनातहि भगवान