Skip to content

बघत राहु दे तुझ्याकडे,Baghat Rahu De Tujyakade

  • by
fb-site

बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे, भेट घडे.

दुःख न उरले सरली भीती
अंगांगांतुन भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे, चहूकडे.

गीत फुले कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे, उंच कडे.

सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे, गगन बुडे.

Leave a Reply

Your email address will not be published.