निसर्गराजा ऐक सांगते,Nisarga Raja Aik Sangate

निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे

तो दिसला अन्‌ मी पाहिले — पाहिले परी ते कुरऱ्याने
डोळ्यात इशारे हसले — हसले ते मोठ्या तोऱ्याने
हे कसे न त्याला कळले — कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले थोडे चुकले रे

का चाललात ? — तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना — का ? — वा छान दिसतंय्‌ ! — काय ?
हे रूप भिजलेलं — आणि ते पहा — काय ?
अन्‌ तुमचं मनही भिजलेलं — कशानं ?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं

तो भाव प्रीतीचा दिसला — दिसला मग संशय कसला ?
हा नखरा का मग असला ? — असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला ? — कसला तो प्रियकर भोळा !
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडले रे

Leave a Reply