Best marathi songs lyrics in hindi fonts

Best marathi songs lyrics in hindi fonts

त्या कोवळ्या फुलांचा,Tya Kovalya Phulancha

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही

नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी

रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतु
वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी

थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहिला मी

Tu Majhi Mauli, तूं माझी माउली

तूं माझी माउली तूं माझी साउली ।
पाहतों वाटुली पांडुरंगे ॥१॥

तूं मज येकुला वडील धाकुला ।
तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥

तुका म्हणे जीव तुजपाशीं असे ।
तुजविण ओस सर्व दिशा ॥३॥

तूं पापी अधमाधम,Tu Papi Adhamadham

तूं पापी अधमाधम खलकषाय, निंद्य जगिं तुज काय ।
मूर्तिमंत तूं अपाय, संग्रहघट कुमतीचा हा त्वदीय काय ॥

करुनि विविध पातकांस । भोगिति जे नरकवास ।
प्रमुख त्यांत व्हावयास । कोण तुजशिवाय ॥

तो म्हणाला सांग ना,To Mhanala Sang Na,


तो म्हणाला, सांग ना गे मी तुझा ना साजणी
ती म्हणाली, रत्न राया मी तुझ्या रे कोंदणी

तो म्हणाला, प्रेम म्हणजे वेड मजला वाटते
ती म्हणाली, गोड अन् ते ओढ जीवा लाविते

तो म्हणाला, भावनेचे खेळ सारे नाचरे
ती म्हणाली, जीवनाचा भावना आधार रे

तो म्हणाला, प्रीत करिते दो जीवांची एकता
ती म्हणाली, होय ना? मग का अशी ही दूरता?

तेचि पुरुष दैवाचे,Techi Purush Daivache


तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥

अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी ।
देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥

तेजा नभिं ज्या साहवेना,Teja Nabhi Jya Sahavena


तेजा नभिं ज्या साहवेना, तें देई मृदुला शोभा नयना ॥

सत्या कठोरा ज्या सोसवेना, करि तेंच तव मुख मधु मना ॥

बहु:दुख संसार, परि दे जना अति सौख्य साध्वीसंगे जाणा ॥

तू नसतिस तर,Tu Nasatis Tar


तू नसतिस तर, तू नसतिस तर तू नसतिस तर गेले असते रोप चिमुकले सुकून-वाकुन तू नसतिस तर केले असते कुणी तयावर अमृतसिंचन ? तू नसतिस तर मिळता कोठुन घरट्याचा हा रम्य निवारा तू नसतिस तर मिळता कोठुन पंखाखाली गोड उबारा ? तू नसतिस तर कळली नसती कळ्या-फुलांची कोमल बोली तू नसतिस तर मिळली नसती मृदु शीतलता चांदण्यातली ! तू नसतिस तर कळले नसते जीवन म्हणजे अथांग प्रीती तू नसतिस तर जुळल्या नसत्या गीताच्या या मंजुळ पंक्ती !

तू नजरेने ‘हो’ म्हटले,Tu Najarene Ho Mhatale


तू नजरेने ‘हो’ म्हटले, पण वाचेने वदणार कधी ?
कर पडलेत गळ्यांत तुझे, पण वरमाला पडणार कधी ?
तुझे हासरे हृदय आठवित, दुःखाची विसरते घडी
त्या हृदयाचा या हृदयाशी संगम ग, होणार कधी ?
तू नसताना तुझी आठवण, मना जाळिते पदोपदी
एक विचारू तुला ?
काय ?
होणार कधी ग सप्तपदी

तू नसता मजसंगे वाट,Tu Nasata Maj Sange Vaat


तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची
संगतीस एकाकी वेदना मनाची !
मादक तो पुष्पराग, श्वास तो सुगंधी

स्पर्शभास ओझरते, ती नवखी धुंदी
विरहाची दीर्घ युगे मीलने क्षणाची !
क्षण यावे जवळ जरा फिरून दूर जावे

अर्ध्यावर तुटून सूर गीत ओघळावे
देव म्हणू, दैव म्हणू, योजना कुणाची ?

तू का वदसि मला कटु,Tu Ka Vadasi Mala Katu


तू का वदसि मला कटु बोला,
अबोला, बरा या काला ॥

प्रेमनाश झाला, केंवि राग आला ?

नच मधुने नाशा भ्रमराला ॥

तो एक राजपुत्र मी,To Ek Rajputra Mi


तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल
घालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल

केसात पानजाळी, कंठात रानवेल
तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ

भाऊ रे शूर अति, होईल सेनापति
भाऊ रे भाऊ करून स्वारी, दुष्टास चारील धूळ

होईल बाबा प्रधान, राखिल तो इमान
सुखी रे सुखी राज्य सारे, चुटकीत तो करील

तेजाचा पसारा घेऊन,Tejacha Pasara Gheun


तेजाचा पसारा घेऊन निघाला
सूर्य पश्चिमेला आता देवा

धरेवरी संध्या देवा, उतरली
माझीच सावली भीती दावी

उघडे असू दे डोळे यातनांचे
परी सोसण्याचे बळ देई

तू येता सखि माझ्या,Tu Yeta Sakhi Majhya


तू येता सखि माझ्या सदनी
जीवन सुफलित झाले !

तू संजीवक सुखदा मूर्ती
प्रणयार्ताची आशापूर्ती
स्नेहमयी तू प्रीती ! प्रीती !
युगायुगांचे तृषित हृदय हे
तुजला बघुन निवाले !

तू बुद्धि दे तू प्रकाश,Tu Buddhi De Tu Prakash


तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखात ह्या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

Leave a Reply