डौल मोराच्या मानचा Daul Morachya Manacha

जीवाशिवाची बैलजोड, लावल पैजेला आपली कुडं,

लावल पैजेला आपली कुड, नी जिवाभावाचं लिंबलोण

नीट चालदे माझी गाडी, दिन रातीच्या चाकोरीन,

दिन रातीच्या चाकोरीन, जाया निघाली पैलथडी रं !

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा

येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा

तान्या-सर्जाची हं नाम जोडी

कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं

धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी

सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी माझ्या राजा रं

सती शंकराची माया, इस्नू लक्षुमीचा राया

पुरुस परकरतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं

Leave a Reply