चल सर्जा चल राजा,Chal Sarja Chal Raja

चल सर्जा चल राजा बिगी बिगी बिगी जायाचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतक-याचं

माथ्यावरती दिवसाचा ये डोळा… चल सर्जा
होय भुकेला शंभू हा, हाय भोळा… चल राजा
भाकर काढा, झुणका रांधा, पोट भरे रायाचं

उडेल फेटा पळसाच्या रंगाचा… चल सर्जा
खण जर्तारी आणीन मी भिंगाचा… चल राजा
तुजवर माळा घुंगुर वाळा लेणं सौभाग्याचं

येईल आता चांदोबा आभाळी… चल सर्जा
होईल वेडी पारंब्यांची जाळी… चल राजा
कलत्या मना डुलत्या धना टकमक नच पाह्याचं

Leave a Reply