Skip to content

चला सख्यांनो हलक्या,Chala Sakhyano Halakya

fb-site

चला सख्यांनो हलक्या हाते, नखांनखांवर रंग भरा
ग नखांनखांवर रंग भरा

आज सावलीपरी जायचे त्यांच्यामागे पाउल ग
पायी पैंजण बांधा द्याया आगमनाची चाहुल ग
सिंहकटीवर स्वैर खेळू द्या, रत्‍नमेखला सैल जरा

बाहुंवरती बांधा बाई, बाहूभुषणे नागाची
अंचलि झाका हृदयावरची कमळे ही अनुरागाची
गळ्यांत घाला हार साजिरा, पदकी त्याच्या दिव्य हिरा

वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा ग
आकाशातिल नक्षत्रासम माथी मोती जडवा ग
सौभाग्याच्या नगरा नेते, सौंदर्याचा थाट पुरा

Leave a Reply

Your email address will not be published.