गोविंद गोविंद,Govind Govind

गोविंद गोविंद ।
मना लागलिया छंद ॥१॥

मग गोविंद ते काया ।
भेद नाही देवा तया ॥२॥

आनंदले मन ।
प्रेमें पाझरती लोचन ॥३॥

तुका म्हणे आळी ।
जेवी नुरे चि वेगळी ॥४॥

Leave a Reply