Skip to content

एक होता राजा,Ek Hota Raja

  • by
0 1089

एक होता राजा, एक होती राणी
अचल तयांची अनुपम प्रीती

दिव्य तयांची सुंदर नगरी
दु:ख न तेथे वास करी

विटुनि आपुल्या सदना उतरे
स्वर्गसौख्य जणु भूमिवरी

बोले राणी, “मन्मन मोती”
राजा बोले, “मी मनचोर”

राणी बोले, “चंद्रिकाच मी”
बोले राजा, “मीहि चकोर”

प्रणयोद्यानी करिती क्रीडा
दंग नर्तनी हर्षभरे
नाचती लतिका, फुले, झरे

Leave a Reply

Your email address will not be published.