उजळू स्मृती कशाला,Ujalu Smruti Kashala

उजळू स्मृती कशाला अश्रूंत दाटलेली ?
सांगू कशी कहाणी स्वप्नांत रंगलेली ?

आतूर लोचनांचे ते लाजरे बहाणे
मौनात साठलेले हितगूजही दिवाणे
नाती मनामनांची भाषेविनाच जुळली

ते फूल भावनेचे कोषांत आज सुकले
संगीत अंतरीचे ओठी विरून गेले
हृदयास जाळणारी आता व्यथाच उरली

तू दाविलेस सखया, मज चित्र नंदनाचे
उधळून तेच गेले संचीत जीवनाचे
आता कुठे किनारा माझी दिशाच चुकली

Leave a Reply