आला वसंत देही, मज ठावूकेच नाही

आला वसंत देही, मज ठावूकेच नाही

भीतीविना कशाचा देहावरी शहारा
हे ऊन भूषविते सोन्यापरी शरीरा
का गुंफिली जरीने आभाळीची निळाई

ओठांत थांबते का हासू उगाच माझे
बाहेर डोकविता का बोल आज लाजे
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या नेणत्या जीवाला हे गूज आकळेना
ये गंध मोगर्‍याचा, आली फुलून जाई

L – ग. दि. माडगुळकर
M – सुधीर फडके
प्रपंच – 1961

Leave a Reply