Skip to content

असेच हे कसेबसे,Asech He Kasebase

fb-site

असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे … नसायचे.

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका;
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.

असाच हा श्वास तोकडा

पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.

असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्याहव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.

Leave a Reply

Your email address will not be published.