Skip to content

अबीर गुलाल उधळीत रंग Abir Gulal Udhalit

0 403

अबीर गुलाल उधळीत रंग ।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥

L – संत चोखामेळा,
M – राम फाटक

Leave a Reply

Your email address will not be published.