” अनुरागाचे थेंब झेलती प्रीत-लतेची पाने
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलती धुंद तराणे
मंतरला हा कुंज लाजरा
महिवरला सुम-भार हासरा
झिरमिर झिरमिर पाऊसधारा गाती श्रावण-गाणे
मधुमय हा मृद्गंध वाहतो
बहरुनिया वनवृंद नाचतो
तरु वेलींना असे बिलगती अधि-या प्रीत-सुखाने
L – शांताराम नांदगावकर
M – अशोक पत्की
S – अनुराधा पौडवाल