अणुरेणिया थोकडा Anureniya Thokada

अणुरेणिया थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥

गिळुन सांडिले कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥

सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटी ॥३॥

तुका म्हणे आता ।
उरलो उपकारापुरता ॥४॥

L – संत तुकाराम,
M – राम फाटक,
S – पं. भीमसेन जोशी

Leave a Reply