अजून आठवे ती रात Ajun Aathave Ti Raat

अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली

जरा स्पर्श होता सुटे कंप हाती
नको बंद आता अशा धुंद राती
लाजलाजुनी का आज दूर गेली

मिटून घेतले तू पंख पापण्यांचे
तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे
नको हा दुरावा अशा रम्य वेळी

L – मधुसूदन कालेलकर,
M – राम कदम,
S – चंद्रशेखर गाडगीळ,
पारध (१९७७)

This Post Has One Comment

Leave a Reply