अजब सोहळा Ajab Sohala

” अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा !

मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा !

किती काळ साहील ?
किती मूक राहील ?
वादळली माती करी वा-याचा हिंदोळा !

कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे, आता बघ उघडून डोळा !

मातीची धरती
देह मातीचा वरती
माती जागवू दे मातीचा जिव्हाळा !

L – शान्‍ता शेळके
M – भास्कर चंदावरकर
S – रवींद्र साठे
चित्रपट – गारंबीचा बापू (१९८०)

Leave a Reply