अगा वैकुंठीच्या राया Aga Vaikunthichya Raya

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥

रचना – संत कान्होपात्रा
संगीत – मा. कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर – श्रीपादराव नेवरेकर
नाटक – संत कान्होपात्रा (१९३१)

Leave a Reply